Friday, January 24, 2020

श्री.एम.बी.पारळकर यांच्या तर्फे स्मार्ट  टी.व्ही.व लॅपटॉप भेट देत जि.प.प्रा.शाळा पारळा झाली डिजिटल
        श्री.एम.बी.पारळकर यांनी श्रीम.सुशिला भालचंद्र पारळकर यांच्या सौजन्याने जि.प.प्रा.शाळा पारळा शाळेस स्मार्ट टी.व्ही.व लॅपटॉप सप्रेम भेट देत पारळा शाळा तसेच लोणी केंद्रातील 20 शाळा डिजिटल करण्यासाठी सहकार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला. यासाठी पर्यावरण संवर्धन समिती ,पुणे यांचेदेखील सहकार्य लाभणार आहे.
           एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यम हे शाळांसाठी नितांत आवश्यक असून याकरीता लोणी केंद्रातील सर्व शाळांसाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचा संकल्प श्री.पारळकर यांनी व्यक्त केला. पारळा ही शाळा जिल्हयातून गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर राहून सर्वोच्च ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी श्री.अशोक गायकवाड सर यांनी केले. 
         ग्रामीण भागातील मुलांना चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळून, सशक्त  नागरिक तयार व्हावेत व त्यांनी देशाचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.मान्यवरांनी या प्रसंगी आपआपले मनोगत मांडले. श्री.भागवत सर यांनी उद्धाटनानंतर सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी पारळा गावचे ग्रामस्थ , पालक , शिक्षणप्रेमी , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पुढील मान्यवर उपस्थित होते.
श्री.एम.बी.पारळकर ,
श्री.विशाल पा.शेळके (सरपंच पारळा),
श्री. संतोष पा.आहेर (वि.का.सो.पारळा),
श्री.अशोक गायवाड सर ,
श्री.योगेश पा.पवार (शा.व्य.स.अध्यक्ष),
श्री.ज्ञानेश्वर पा. बावके (शा.व्य.स.उपाध्यक्ष),
श्री.चन्ने सर ( जि.प.प्रा.शाळा पारळा),
श्री.पी.एन.निकम (केंद्र प्र.प्रतिनिधी),
श्री.गोरखनाथ भागवत सर (जि.प.प्रा.शाळा पारळा),
श्री.जालिंदर सोनवणे , नितिन आहेर, श्री.बाळासाहेब पा.उगले ,श्री.कैलास टेलर, श्री.बाळासाहेब सांगळे, श्री.कमलाकर सोनवणे, श्री.दादासाहेब आहेर, श्री.रमेश सोनवणे, श्री.शशिकांत पवार, श्री.भगवान सोनवणे, श्री. भिवसने सर, श्री.गोल्हार सर, श्री.पी.आर.पाटील सर, श्री.भावलाल पवार, श्री. वाल्मीक पा.आरोटे, श्री.निलेश मगर, श्री.नितिन दाणे, श्री.लहानू ठाकरे, श्री.काशिनाथ आहेर सर, श्री.दराडे सर व शाळेचे आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

No comments: